“फोनमध्ये काहीतरी गडबड आहे,असं वाटतंय का ?”
खरं सांगायचं तर, तुमचा फोन हॅक झाला आहे असं जेव्हा तुम्हाला वाटत तेव्हा ते खूप भयानक आणि भीतीदायक असते.कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवत आहे असे वाटणे हे निश्चितच एक भयानक वाटण्यासारखं आहे. पण घाबरू नका! तुमचा मोबाइल हॅक झाला आहे हे कसे ओळखायचे आणि तसे असल्यास काय करावे याबद्दल येथे माहिती दिली आहे.
तुमचा मोबाइल हॅक झाल्याची काही लक्षणे खाली दिली आहेत.
- बॅटरी नेहमीपेक्ष्या लवकर संपणे: जर तुमच्या फोनची बॅटरी नेहमीपेक्षा जास्त वेगाने संपत असेल, ते काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षण असू शकते.
- मोबाइल जास्त गरम होणे: काहीही ऍक्टिव्हिटी नसतानाही तुमचा फोन जास्त गरम होत आहे का? ते काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षण असू शकते.
- मोबाइलचा परफॉर्मन्स स्लो होणे : मोबाइल अँप क्रॅश होणे किंवा मोबाईलचा परफॉर्मन्स स्लो होणे हे तुमच्या मोबाईल मध्ये एखादा virus असल्याचे लक्षण असू शकते.
- डेटा पॅक डेटा वापर नसतानाही जास्त संपणे: डेटा वापरात अचानक वाढ म्हणजे डेटा चोरीला जात असल्याचे लक्षण असू शकते.
- तुम्ही ऑर्डर न केलेले मेसेज आणि कॉल येणे : तुम्ही कधीही सबस्क्राईब न केलेल्या सेवांसाठी मेसेज येणे किंवा त्या सेवासाठीचे शुल्क आकारले जात असेल तर हा खूप मोठा गोंधळ असल्याचं लक्षण आहे.
- मोबाईल अँप्लिकेशन ऍक्टिव्हिटी: एखादा मोबाईल ऍप्लिकेशन आपोआप उघडणे किंवा नाविन अँप इन्स्टॉल होणे हे खूप मोठी गडबड असल्याच चिन्ह आहे.
- सोशल मीडियावरील नोटिफिकेशन: तुम्हाला एखादा लॉगिन नोटोफिकेशन येणे ज्यात असं लोकेशन आहे जेथे तुम्ही कधी गेला नसाल तर तुमचं अकाउंट दुसर कुणीतरी लॉगिन करत आहे किंवा सोशल मिडिया वर तुमच्या परवानगीशिवाय पोस्ट करत असेल तर खूप मोठी गडबड असल्याचं लक्षण आहे.
- बँकिंग अकाउंट: जर तुमचा मोबाइल हॅक झाला आहे अशी खात्री झाली असेल तर लगेच बँकेत फोन करून पुढील बँकिंग व्यवहार ब्लॉक करून ठेवा आणि बँकेत तशी माहिती द्या. जेणेकरून पुढील व्यवहार होणार नाहीत आणि बँकेतील पैसे सुरक्षित राहतील
काय कराल ?
- मोबाईल इंटरनेट पासून डिस्कनेक्ट करा: पुढील डेटा लीक आणि हॅकिंग ऍक्टिव्हिटी टाळण्यासाठी वाय-फाय आणि मोबाइल डेटा बंद करा.
- पासवर्ड बदलणं: सर्व मोबाईल मध्ये लिंक केलेल्या खात्यांचे पासवर्ड बदला आणि 2 फॅक्टर Authentication enable करा. (2FA).
- Virus स्कॅनिंग करा: हॅकिंग अँप किंवा virus शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी विश्वसनीय अँटीव्हायरस इन्स्टॉल करा आणि मोबाईल स्कॅन करा वापरा.
- Check for Call Forwarding:
कॉल फॉरवर्डिंग तपासा:
अँड्रॉइड: फोन अँप > सेटिंग्ज > कॉल फॉरवर्डिंग वर जा..
आयफोन: सेटिंग्ज > फोन > कॉल फॉरवर्डिंग वर जा.
आयफोन: सेटिंग्ज > फोन > कॉल फॉरवर्डिंग वर जा.
हे screat कोड वापरा (मोबाईल सर्व्हिस Provider वरअवलंबून):
फॉरवर्ड केलेले सर्व कॉल तपासा: *#२१#
अनुत्तरित कॉल फॉरवर्ड चेक करा: *#६१#
बिझि कॉल फॉरवर्ड तपासा: *#६७#
अनुत्तरित कॉल फॉरवर्ड चेक करा: *#६१#
बिझि कॉल फॉरवर्ड तपासा: *#६७#
हॅक होण्यापासून कसे टाळावे:
- पासवर्ड : तुमच्या खात्यांसाठी मजबूत,कॉम्प्लेक्स पासवर्ड वापरा. पासवर्डचा पुनर्वापर टाळा आणि चांगल्या सुरक्षिततेसाठी पासवर्ड मॅनेजर वापरण्याचा विचार करा.
- अॅप स्टोअर : मोबाइल अँप फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर सारख्या विश्वसनीय स्रोतांवरून अॅप्स डाउनलोड करा. थर्ड पार्टी अॅप स्टोअरपासून सावध रहा.
- सार्वजनिक वाय-फाय : बँकिंग सेवा किंवा इतर महत्वाच्या संवेदनशील व्यवहारांसाठी सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा.
- तुमचे सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा: नियमित सॉफ्टवेअर अपडेट केल्याने अँप मधील दोष फिक्स केले जातात ज्याचा वापर हॅकर तुमचा मोबाईल हॅक करण्यासाठी केला जातो, जम्हणून तुमचा फोन नेहमीच अपडेटेड असल्याची खात्री करा.
- लिंकवर क्लिक करू नका: ईमेल, मजकूर संदेश किंवा सोशल मीडियामधील संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा. या लिंक्समुळे तुमची माहिती चोरण्यासाठी डिझाइन केलेल्या फिशिंग वेबसाइट्स कडे जाऊ शकते.
- Security अॅप इन्स्टॉल करा : तुमच्या फोनसाठी विश्वसनीय सिक्युरिटी अँप्लिकेशन साठी गुंतवणूक करा. जे मोबाईल मधील मालवेअर किंवा हॅकिंग अँप शोधू शकतात, आणि तुमचा मोबाईल हॅकिग पासून सुरक्षित ठेवण्यात मदत करतात.
सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी करावी:
तुमचा फोन हॅक झाला आहे आणि तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात आहे असा तुम्हाला संशय असल्यास, योग्य अधिकाऱ्यांना घटनेची तक्रार करणे महत्त्वाचे आहे. भारतासह अनेक देशांमध्ये, सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी नियुक्त चॅनेल आहेत:
- ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी Cyber Crime Portal Cyber C rime पोर्टल ला लॉगिन करून योग्य ती माहिती देऊन तक्रार करा .
- तात्काळ मदतीसाठी Cyber Crime Helpline क्रमांक 1930 हेल्पलाइनवर कॉल करा. ते तुम्हाला गुन्ह्याची तक्रार करण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यास आणि मदत करण्यास मदत करू शकतात. तात.
Total Visitor: 21