तुमचे WhatsApp सुरक्षित आहे का?
आजच्या डिजिटल जगात, तुमचे WhatsApp खाते केवळ संदेश पाठवण्यापुरते मर्यादित नसून, ते तुमच्या वैयक्तिक संभाषणांचे, संपर्कांचे आणि आर्थिक व्यवहारांचे साधन आहे. दुर्दैवाने, सायबर गुन्हेगार सतत WhatsApp खात्यांचा गैरवापर करतात.सायबर गुन्हेगार नेहमीच WhatsApp खात्यांच्या शोधात असतात, आणि मोठ्या प्रमाणात घोटाळे, आर्थिक फसवणूक आणि इतर गोष्टींसाठी वापर करतात.
हॅकर्स तुमचे खाते हॅक करण्यासाठी अनेक तंत्रे वापरतात आणि बहुतेक वेळा आपल्याला त्याची जाणीवही होत नाही.
तुमचे WhatsApp हॅक झाल्याची चिन्हे:
- तुम्ही कधीही पाठवले नाही अशा संदेशांना रिप्लाय येतात.
- तुमच्या कॉन्टॅक्ट्स विचित्र संदेशांबद्दल तक्रार करतात.
- तुमच्या चॅटमधील संदेश आपोआप नाहीसे होतात.
- तुमच्या फोनवर OTP येतो जरी तुम्ही लॉगिनच्या विनंती केली नसली तरी.
- तुमचे प्रोफाइल नाव, चित्र किंवा बायो बदलले जातात.
- तुमच्या संमतीशिवाय नवीन ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केले जाते.
- तुमचे खाते दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगिन असल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येते.
तुम्हाला यापैकी कोणतेही चिन्हे निदर्शनात आल्यास ताबडतोब योग्य ती काळजी घ्या. हॅकर्स अनेकदा आपल्या अकाउंटचा ऍक्सेस घेऊन आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना संपर्क करून पैसे मागतात , विचित्रपूर्ण मेसेज सेंड करतात किंवा बनावट योजनांमध्ये भाग घेतात.
WhatsApp हॅकर्स कसे करतात?
- Linked Devices Exploit: हॅकर्स तुमचे खाते त्यांच्या डिव्हाइसवर जोडतात आणि तुमच्या चॅटवर लक्ष ठेवतात.
- Re-registration on a New Device: तुमचे खाते दुसऱ्या डिव्हाइसवर रजिस्टर करून तुम्हाला लॉग आउट केले जाते. ज्यामुळे तुम्हाला तुमचा ऍक्सेस लॉक केला जाते. जरी ते मागील मेसेज पाहू शकले नाहीत तरी ते तुमच्या नावाने नको ते मेसेज करू शकतात आणि तुमच्या कॉन्टॅक्टला संपर्क करून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकतात. ज्यात पैसे मागणे नको नको ते मेसेज/व्हिडीओ सेंड करणे, इ .
WhatsApp हॅक झाल्यास काय करावे?
- तुमचे सिम कार्ड तपासा: तुमच्या WhatsApp सोबत जोडलेले सिम तुमच्या फोनमध्येच असल्याची खात्री करा.
- तुमच्याकडे अजूनही WhatsApp चा ऍक्सेस असल्यास- Linked Devices तपासा: WhatsApp > Settings > Linked Devices आणि अनोळखी डिव्हाईस लॉगआउट करा.
- WhatsApp वर ऍक्सेस करू करू शकत नसल्यास OTP द्वारे खाते परत मिळवा: तुमच्या नंबरवर OTP पाठवून WhatsApp री-इंस्टॉल करा.
- जर 2FA व्हेरिफिकेशन मागत असेल जे तुम्ही कधीही सेट केले नसेल: तर तो ईमेलद्वारे रीसेट करा (लिंक केलेला असल्यास)नाहीतर ७ दिवस ऑटोमॅटिक रिकव्हरीसाठी वाट बघा.
- एकदा WhatsAppचा ऍक्सेस तुमच्या नियंत्रणात आला: की लगेचच सर्व कॉन्टॅक्ट्सना कल्पना द्या की तुमचा अकाऊंट हॅक झाला होता. जेणेकरून पुढील ते सतर्क राहतील आणि तुमच्या नावाने होणारे fraud टाळता येतील.
भविष्यातील हॅक टाळण्यासाठी सुरक्षा टिप्स:
- Two-Step Verification: Settings > Account > Two-Step Verification आणि एक मजबूत पिन सेट करा. WhatsApp किंवा कायदेशीर संस्था कधीही तुमचा पिन किंवा व्हेरिफिकेशन कोड विचारणार नाहीत.
- OTP कधीही शेअर करू नका: कोणालाही तुमचा OTP किंवा सिक्युरिटी कोड शेअर करू नका.
- तुमच्या ईमेल खात्यासाठी 2-FA व्हेरिफिकेशन सेट करा: 2-FA व्हेरिफिकेशन कोड सेट करा आणि एक मजबूत पासवर्ड सेट करा.
- संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका: फसवणूक करणाऱ्या लिंक्सपासून सावध राहा.
- सॉफ्टवेअर अपडेट ठेवा: तुमच्या फोनचे आणि WhatsApp चे अपडेट्स नियमित करा.
- एखाद चांगल SECURITY सॉफ्टवेअर इंस्टॉल करा: तुमच्या खात्यांना तडजोड करू शकणाऱ्या मालवेअरपासून सर्व डिव्हाइसचे संरक्षण करा.
हॅकर्स सतत नवीन युक्त्या शोधत असल्याने,आपणास सतर्क राहणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमचे WhatsApp अकाउंट सुरक्षित करण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारांना दूर ठेवण्यासाठी आजच योग्य ती उपाय योजना करा.
सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी करावी ?
तुमचे WhatsApp हॅक झाल्यास, खालील गोष्टी करा:
- ऑनलाईन तक्रार करण्यासाठी Cyber Crime Portal ला भेट द्या.
- तात्काळ मदतीसाठी Cyber Crime Helpline क्रमांक 1930 वर कॉल करा.
अधिक माहितीसाठी CyberDefender ब्लॉग ला भेट द्या.
WhatsApp चॅनेलला Subscribe करण्यासाठी >> येथे क्लिक करा <<
YouTube चॅनेलला Subscribe करण्यासाठी >> येथे क्लिक करा <<
instagram चॅनेलला Subscribe करण्यासाठी >> येथे क्लिक करा <<
Total Visitor: 64